मुंबई. Mumbai Fire News : मुंबईतील जेएमएस बिझनेस सेंटरमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. वृत्तानुसार, जोगेश्वरी पश्चिमेतील बहुमजली इमारतीत आग लागली, आगीनंतर लोकांमध्ये घबराट पसरली.

गांधी शाळेजवळील जेएनएस बिझनेस सेंटरमध्ये सकाळी १०.५० वाजता लागलेल्या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, असे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरुवात केली. इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागल्याचे वृत्त आहे. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) मुंबई अग्निशमन दलाच्या (एमएफबी) मते, ही घटना लेव्हल-२ कॉल म्हणून घोषित करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक अहवालात असे दिसून आले आहे की इमारतीच्या वरच्या मजल्यावर अनेक लोक अडकले आहेत. बचाव कार्य सुरू आहे.

इमारतीच्या दुसऱ्या भागात 10-15 लोक अडकले असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. सर्वजण सुरक्षित असल्याचे व बचावकार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आग आटोक्यात आणण्यासाठी किमान 12अग्निशमन गाड्या आणि इतर अग्निशमन उपकरणे वापरली जात आहेत. घटनास्थळी विविध एजन्सी तैनात करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.