जेएनएन, मुंबई: नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी औद्योगिक भीषण आगीची घटना घडली. ही आग ‘जेल फार्मास्युटिकल्स’ (Zell Pharmaceuticals) या औषधनिर्मिती कंपनीच्या इमारतीत लागली होती. आग लागल्यामुळे परिसरात प्रचंड धूर पसरला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाले आहेत.
आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही
माहितीनुसार, कंपनीच्या उत्पादन विभागातून अचानक धूर निघू लागल्याने कर्मचारी बाहेर पळाले. काही क्षणातच आग संपूर्ण इमारतीत पसरली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉर्ट सर्किट किंवा रासायनिक अभिक्रियेने आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अग्निशमन दलाचा शर्थीचा प्रयत्न
घटनास्थळी नवी मुंबई अग्निशमन दलाचे ८ हून अधिक गाड्या तसेच थाणे आणि वाशी येथून मदत पथके दाखल झाली आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी पाणी आणि फोमचा वापर करण्यात आला आहे.आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन तासांपेक्षा जास्त काळ लागला असून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तर कुठलीही जीविती हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकारीने दिले.