जेएनएन, मुंबई. कुर्ल्यात एक भीषण दुर्घटना घटली आहे. यात आठ जण जखमी झाले आहेत. कुर्ला आणि ट्रॉम्बे या रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. 

अशी झाली दुर्घटना

कुर्ला आणि ट्रॉम्बे दरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) एका प्रकल्पाचे काम सुरु आहे. यावेळी एक जेसीबी मशीन दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येत होती. त्यासाठी क्रेनने ही जेसीबी मशीन उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवली जात होती. त्यावेळी हा परिसर खाली करण्यात आला होता. मात्र, काहीजण या भागात हे सगळे मोबाईलवर शुट करत होते. क्रेनने जेसीबी हवेत बऱ्याच उंचीवर नेला होता तेव्हा अचानक क्रेन व जेसीबी दोन्ही खाली कोसळले.

हेही वाचा - Sugar Price Hike: ऐन सणासुदीत साखरेचे भाव भिडले गगनाला! अनेक जिल्ह्यांत दर 80 रुपयांवर