जेएनएन, मुंबई. साताऱ्यातील फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या (Sampada Munde Doctor Suicide Case) प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सर्व डॉक्टर संघटनांनी राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर निवासी डॉक्टरचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
मुख्यमंत्री यांनी सेंट्रल मार्डच्या प्रतिनिधींशी घेतलेल्या बैठकीत सांगितले की, “सरकार या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेत आहे. चौकशी वेगाने केली जाईल, दोषींवर कठोर कारवाई होईल आणि डॉक्टरांसाठी सुरक्षित कार्य वातावरण तयार करण्यासाठी विशेष समिती नेमली जाईल.” तसेच वैद्यकीय शिक्षण खात्याला याबाबत ‘रेसिडेंट डॉक्टर वेल्फेअर पॉलिसी’ तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
सेंट्रल मार्डची प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिसादानंतर सेंट्रल मार्डने राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत आहे का, यावर आम्ही लक्ष ठेवू. गरज पडल्यास पुन्हा आंदोलनाचा सुरू करू.”
आंदोलनातील प्रमुख मागण्या
- आत्महत्या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी.
- डॉक्टरांसाठी सुरक्षित आणि आदरयुक्त कामाचे वातावरण निर्माण व्हावे.
- रुग्णालयांमध्ये मेंटल हेल्थ सपोर्ट सिस्टीम सुरू करावी.
- ताणतणाव, शाब्दिक अत्याचार आणि कार्यस्थळी भेदभाव याविरोधात नियमित तक्रार निवारण यंत्रणा असावी.
हेही वाचा - Municipal Council Election 2025: नगर परिषद- पंचायत निवडणुकीचा महत्त्वाच्या तारखा आणि आकडेवारी
