जेएनएन, मुंबई: राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायर्तीच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान. तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी (Municipal Council Election 2025) होणार असल्याने या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
महत्वाच्या तारखा
- नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात - 10 नोव्हेंबर
- नामनिर्देशनपत्रची दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर
- नामनिर्देशनपत्रांची छाननी - 18 नोव्हेंबर
- अपील नसलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मदुत- 21 नोव्हेंबर
- अपील असलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर
- मतदानाचा दिवस - 02 डिसेंबर
- मतमोजणीचा दिवस - 03 डिसेंबर 2025
एकूण मतदार व मतदान केंद्र
- पुरुष मतदार- 53,79,931
- महिला मतदार- 53,22,870
- इतर मतदार- 775
- एकूण मतदार- 1,07,03,576
- एकूण मतदान केंद्र- सुमारे 13,355
एकूण जागा आणि आरक्षित जागा
- निवडणूक होत असलेल्या नगरपरिषदा- 246
- निवडणूक होत असलेल्या नगरपंचायती- 42
- एकूण प्रभाग - 3,820
- एकूण जागा- 6,859
- महिलांसाठी जागा- 3,492
- अनुसूचित जातींसाठी जागा- 895
- अनुसूचित जमातींसाठी जागा- 338
- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 1,821
