जेएनएन, मुंबई. Disha Salian Case Update: दिशा सालियन मृत्यू प्रकरण आज मुंबई न्यायलयात पहिली सुनावणी पार पडली आहे. पुढील सुनावणी न्यायाधीश रेवती मोहिते समोर होणार नसून दुसऱ्या खंडपीठ समोर सुनावणी होणार आहे, अशी माहिती अधिवक्ते निलेश ओझा यांनी दिली आहे. राज्य सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत, त्या मागण्या सरकारने मान्य केला आहे. सरकार दिशा सालियान प्रकरणात पूर्ण मदत करत आहे, अशी माहिती ओझा यांनी दिली आहे.

हायकोर्टात पहिली सुनावणी पडली पार 

दिशा सालियानवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप दिशाच्या वडिलांनी याचिकेत केला आहे. सतिश सालियान यांच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात पहिली सुनावणी पार पडली आहे. यावेळी कोर्टानं योग्य खंडपीठासमोर याचिका दाखल करावी, असं म्हटलं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हे निर्देश दिले, कारण याचिकाकर्त्याच्या वकिलांनी हे प्रकरण न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाच्या फेब्रुवारीच्या रोस्टरशी संबंधित असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. यावर न्यायालयानं त्यांना योग्य खंडपीठासमोर याचिका दाखल करण्याचे म्हटलं आहे. या याचिकेत आमदार आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची मागणी या याचिकेत केली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणी वडील सतीश सालियन यांनी केली आहे.

हेही वाचा - Lasalgaon Onion Price Today: पाच दिवसानंतर कांदा लिलाव सुरु, कांद्याचे भाव 250 रुपयांनी कोसळले

लवकर सुनावणी करण्याची विनंती

सतीश यांनी या प्रकरणात एक नवीन याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे यावर आज पहिली सुनावणी पार पडली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केली आहे. या प्रकरणात एनआयए चौकशी करून लवकर सुनावणी करण्याची विनंती ही सतीश सालियान यांनी कोर्टाला केली आहे. दिशा सालियान प्रकरणात मुंबई पोलिस, आदित्य ठाकरे, सूरज पांचोली यांच्यासह अनेकांवर गंभीर आरोप वडील सतीश सालियान यांनी केले आहेत.