जेएनएन, मुंबई: मुंबईतील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. महापालिकेच्या अखत्यारीत येणारी मैदाने, नाट्यगृहे आणि उद्याने घरबसल्या ऑनलाईन बुक करता येणार आहे. मुंबई महानगरपालिकेने हा मोठा निर्णय घेतला असून, त्यासाठी स्वतंत्र अधिकृत अॅप विकसित करण्यात येत आहे.
एका क्लिकवर सुविधा मिळणार!
आजपर्यंत नाट्यगृहं किंवा मैदाने बुक करण्यासाठी नागरिकांना पालिकेच्या कार्यालयांत जावे लागत होते. मात्र आता एका क्लिकवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे. महापालिकेने सर्व सुविधा एका अॅपवर देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व सोयीची होणार आहे.
नाटकांच्या तिकिट ही ॲपवर!
बुकिंगसोबतच या अॅपद्वारे नाटकांच्या तिकिटांची खरेदीही करता येणार आहे. त्यामुळे सांस्कृतिक उपक्रमांपासून ते क्रीडा व इतर कार्यक्रमांसाठी नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ करण्याची गरज राहणार नाही.
अँप लवकरच सुरू होणार!
महापालिकेकडून या अॅपची तांत्रिक तयारी सुरू असून, काही दिवसांतच हे अॅप सुरू होणार आहे.
हेही वाचा:विक्रोळीत मोठी दुर्घटना! झोपडीवर दरड कोसळली, वडील-मुलीचा मृत्यू, दोघे जखमी