जेएनएन, मुंबई. Corona Cases In Mumbai: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत मागील काही दिवसांत पाच कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता आता आज एका 66 वर्यीय वयोवृद्धाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उपायुक्त केडीएमसी प्रसाद बोरकर यांनी दिली आहे.

केडीएमसी हद्दीत कोरोनाचे एकूण 5 रुग्ण आहेत. त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एका रुग्णाला डिस्चार्ज मिळाला तर दोघांवर उपचार सुरु आहे, असंही उपायुक्त केडीएमसी प्रसाद बोरकर यांनी सांगितलं. 

राज्यात 208 कोरोना प्रकरणे

राज्यात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही 208 वर पोहोचली आहे. देशामध्ये कोरोनाची समस्या वाढत आहे. एक्टिव कोरोना संख्या ही 1010 वर पोहोचली आहे.

11 रुग्णांचा मृत्यू

    महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या 12 वर पोहोचली आहे.