जेएनएन, मुंबई. Raj thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha : महाराष्ट्रातील मतदार यादीतील कथित घोटाळे आणि “मतचोरी”च्या आरोपांवरून आज मुंबईत “सत्याचा मोर्चा” काढण्यात आला आहे. या मोर्चाचे नेतृत्व राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंनी संयुक्तपणे केले आहे. विशेष म्हणजे, या मोर्चाला काँग्रेसने साथ दिली असली तरी प्रमुख नेते अनेक कारण सांगून मोर्चाला “दांडी” मारणार आहेत.
मोर्चाचे उद्दीष्ट!
या मोर्चातून ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगावर मतदार यादीतील बोगस नोंदींचा आरोप केला आहे. महाराष्ट्रात तब्बल ९६ लाख बोगस मतदारांची नोंद झाल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. मुंबईतच सुमारे आठ लाख बोगस नावे मतदार यादीत असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. मतचोरी करून “लोकशाहीचा अपमान केला आहे. मतदार याद्या हेराफेरी करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राज ठाकरे यांची टीका!
मतदार यादीतील फेरफार म्हणजे लोकशाहीवर डाका आहे. निवडणूक आयोगाने या घोटाळ्यात सहभागी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
