जेएनएन, मुंबई. IAS Officers Transfer: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या त्यांनी बदल्या केल्या असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनेक कामांचा सपाटा सुरु आहे. येत्या काही दिवसांत फडणवीस सरकार त्यांचे 100 दिवस पूर्ण करणार आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत 7 आयएएस आधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

IAS बदली आदेश 

  1. डॉ. निधी पांडे (IAS:RR:2001) यांची व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
  2. लक्ष्मीनारायण मिश्रा (IAS:RR:2012) यांची सह व्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
  3. डॉ. भरत बास्तेवाड (IAS:SCS:2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, ZP, रायगड यांची आयुक्त, MGNREGS, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
  4. डॉ. इंद्राणी जाखड (IAS:RR:2016) महानगरपालिका आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांची जिल्हाधिकारी, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  5. वसुमाना पंत (IAS:RR:2017) महासंचालक, VANAMATI, नागपूर यांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  6. वैष्णवी बी. (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
  7. नेहा भोसले (IAS:RR:2020) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा - Disha Salian Case: दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवीन याचिकेवर सुनावणी पडली पार, दुसऱ्या खंडपीठ समोर होणार सुनावणी