जेएनएन, मुंबई. Chawl Collapse in Mankhurd: मुंबईतील मानखुर्द भागात एक घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच, आर्थिक मदत जाहीर केली आहे.

मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत

मुख्यमंत्र्यांनी मानखुर्द भागात झालेल्या दुर्घटनेवर दुःख केले आहे. त्यांनी मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली आहे.

सहा जणांचा मृत्यू

मुंबईतील मानखुर्द भागात रविवारी रात्री मुसळधार पावसात तीन मजली चाळ कोसळल्याने किमान सहा जण ठार झाले आणि एक जण जखमी झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.  ढिगाऱ्याखाली एक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून, त्याला शोधण्यासाठी 'नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स' (NDRF) च्या जवानांसह विविध यंत्रणांचे बचावकार्य सुरू आहे.

    मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर

    भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे.  या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना दिनांक 6 जुलै 2026 रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे.