जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Forecast: राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यातच आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन हे हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
पुढील 3 तासांत या भागात मुसळधार
आज 6 जुलै, सकाळी 7:15 - पुढील 3-4 तासांत उत्तर कोकण आणि पुणे, सातारा, नाशिक व रायगडच्या घाट क्षेत्रांमध्ये मध्यम ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे; यात काही ठिकाणी पावसाचा जोर अत्यंत तीव्र असू शकतो, अशी माहिती हवामान तज्ञ होसळीकर यांनी दिली आहे.
पुण्यात शहरात यलो तर घाट भागात रेड अलर्ट (Pune Rain Alert)
हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यात घाट भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर शहर परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात सध्या पावसाची संततधार सुरु आहे. तर खडकवासला धरणाच्या धरणप्रवणक्षेत्रात पाऊस होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे
मुंबईत रेड अलर्ट (MumbaI Weather Update)
भारतीय हवामान खात्याने (IMD) बृहन्मुंबई क्षेत्रात अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा दिला आहे. दरम्यान, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता IMD ने वर्तविली आहे.

जिल्हानिहाय पावसाचा अलर्ट (Maharashtra Weather Update)
- रेड अलर्ट - हवामान विभागाने काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागाचा समावेश आहे.
- ऑरेंज अलर्ट - सिंधुदुर्ग, नाशिक घाट, कोल्हापूर घाट, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- यलो अलर्ट- पुणे, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात परिसरात हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा - Pune Rain News: पुढील 3 तास अत्यंत महत्त्वाचे; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता
