जेएनएन, मुंबई. BMC Mayor Reservation Lottery: महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बीएमस म्हणजे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.
बीएमसीत खुला प्रवर्गांचा होणार महापौर
बीएमसी महापौर पदासाठी आरक्षण जाहीर असून बीएमसीत खुला प्रवर्गांचा महापौर होणार आहे.
29 महानगरपालिकांमधील आरक्षणाचं गणित
- अनुसूचित जमाती – 1
- अनुसूचित जाती – 3
- ओबीसी – 8
- सर्वसाधारण प्रवर्ग – 17
खुल्या प्रवर्गासाठी सुटलेल्या महानगरपालिका
- छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला)
- नवी मुंबई: सर्वसाधारण
- वसई- विरार: सर्वसाधारण
- नागपूर: सर्वसाधारण
- बृहन्मुंबई: सर्वसाधारण
- सोलापूर: सर्वसाधारण
- अमरावती: सर्वसाधारण (महिला)
- नाशिक: सर्वसाधारण
- पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण
- पुणे: सर्वसाधारण
- परभणी: सर्वसाधारण
- भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण
- मालेगाव: सर्वसाधारण
- मीरा- भाईंदर: सर्वसाधारण
- नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण
- सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण
- धुळे: सर्वसाधारण (महिला)
हेही वाचा - BMC Mayor Reservation: बीएमसी महापौर पदासाठी आरक्षण जाहीर, खुला प्रवर्गांचा होणार महापौर
