जेएनएन, मुंबई. BMC Mayor Reservation Lottery: महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बीएमस म्हणजे मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.

बीएमसीत खुला प्रवर्गांचा होणार महापौर 

 बीएमसी महापौर पदासाठी आरक्षण जाहीर असून बीएमसीत खुला प्रवर्गांचा महापौर होणार आहे.

मुंबई महापालिकेत युतीचा महापौर होणार?

नगरविकास विभागाच्या वतीने ही आरक्षण सोडत काढली गेली असून, सोडत जाहीर झाल्याने सर्वच महापालिकांमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकांमध्ये एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने, महापौरपदासाठी जोरदार लॉबिंग, युती-आघाड्यांचे प्रयत्न आणि नगरसेवकांच्या भेटीगाठींना सुरुवात झाली आहे.