जेएनएन, मुंबई. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महापौरपदाची आरक्षण सोडत आज होणार आहे. त्यानंतर या महानगरपालिकांवर कोण महापौर होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही सोडत अखेर जाहीर झाली आहे.

महापौरपदासाठी जोरदार लॉबिंग, युती-आघाड्यांचे प्रयत्न 

नगरविकास विभागाच्या वतीने ही आरक्षण सोडत काढली गेली असून, सोडत जाहीर झाल्याने सर्वच महापालिकांमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. अनेक महापालिकांमध्ये एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने, महापौरपदासाठी जोरदार लॉबिंग, युती-आघाड्यांचे प्रयत्न आणि नगरसेवकांच्या भेटीगाठींना सुरुवात झाली आहे. 

आरक्षण सोडत राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची 

आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर संबंधित महापालिकांमध्ये महापौर निवडीची अधिकृत प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे आजची आरक्षण सोडत राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यानंतर महापालिकांच्या सत्तासमीकरण ठरणार आहे.

कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद कोणत्या गटासाठी आरक्षित?

    • कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती
    • ठाणे – अनुसूचित जाती
    • जालना – अनुसूचित जाती (महिला)
    • लातूर – अनुसूचित जाती (महिला)
    • इचलकरंजी – ओबीसी
    • पनवेल – ओबीसी
    • अहिल्यानगर – ओबीसी
    • अकोला – ओबीसी
    • उल्हासनगर – ओबीसी
    • कोल्हापूर – ओबीसी
    • चंद्रपूर – ओबीसी
    • जळगाव – ओबीसी
    • मुंबई महानगरपालिका – खुला प्रवर्ग
    • पुणे महानगरपालिका – खुला प्रवर्ग
    • औरंगाबाद महानगरपालिका – खुला प्रवर्ग
    • धुळे महानगरपालिका – खुला प्रवर्ग
    • अमरावती – खुला प्रवर्ग (महिला)
    • भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग
    • मालेगाव – खुला प्रवर्ग
    • मीरा-भाईंदर – खुला प्रवर्ग
    • नागपूर – खुला प्रवर्ग (महिला)
    • नांदेड-वाघाळा – खुला प्रवर्ग (महिला)
    • पिंपरी-चिंचवड – खुला प्रवर्ग
    • नाशिक – खुला प्रवर्ग
    • नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)
    • परभणी – खुला प्रवर्ग
    • सांगली-मिरज – खुला प्रवर्ग
    • वसई-विरार – खुला प्रवर्ग
    • सोलापूर – खुला प्रवर्ग