एजन्सी, मुंबई. Suresh Dhas on Bishnoi gang, भाजप आमदार सुरेश धस यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. "माझ्यावर हरणाचे मांस खाण्याचे खोटे आरोप लावले जात आहेत, जेणेकरून 'बिश्नोई टोळी' माझी हत्या करेल." असं भाजप आमदार सुरेश धस म्हटलं आहे.
अडकवण्याचा कट
गेल्या महिन्यात एका हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला सतीश भोसले उर्फ 'खोक्या' याच्याविरोधात दाखल असलेल्या प्रकरणांमध्ये त्यांना अडकवण्याचा कट रचला जात आहे, असा दावा सुरेश धर यांनी केला आहे.
मी कधीही असे मांस खाल्ले नाही
बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी भोसले हा धस यांचा सहकारी मानला जात होता. त्याच्यावर वन्य प्राण्यांच्या शिकारीचाही आरोप आहे. "परळी (बीड जिल्ह्यात) मधील काही नेते माझ्या मतदारसंघात आले आणि त्यांनी दावा केला की, मला भोसलेकडून हरणाचे मांस मिळाले. मात्र, मी कधीही असे मांस खाल्ले नाही." असं धस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
मला यात फसवलं जात आहे
मी 'माळकरी' (भगवान विठ्ठल यांचे अनुयायी) आहे, आपण मांस खात नाही. भोसले याला पुढे करुन मला फसवण्याचा प्रयत्न आहे. असा आरोप धस यांनी केला. तसंच, "बिश्नोई समुदाय (राजस्थानचा) हरणाला पवित्र मानतो. त्यामुळे मला यात फसवलं जात आहे, ज्यामुळे लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडाकडून माझ्यावर हल्ला होईल. बिश्नोई टोळीच्या सदस्यांना मुंबईत आणण्यात आले." असाही दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडणार मुद्दे
बिश्नोई टोळीच्या सदस्यांना मला 'संपवण्याच्या' उद्देशाने मुंबईला पाठवण्यात आले होते. राजस्थानमधील काही व्यक्तींसाठी विमानाची तिकिटे खरेदी केल्याची माहिती त्यांना मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले. ते हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार आहे, असंही धस यांनी सांगितलं.
धनंजय मुंडेंवर आरोप
धस म्हणाले की, त्यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला होता, ज्यामुळे खळबळ माजली होती आणि या मुद्द्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या आणि राज्यमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आता भोसले प्रकरणात या आरोपांसह, माझ्यावर पलटवार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा दावाही धस यांनी केला.
हेही वाचा - Latur News: गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा, शिक्षकानं केलं मुलाचं लैंगिक शोषण, नराधमाला अटक
धनजंय मुंडेंचा राजीनामा
दरम्यान, देशमुख हत्या प्रकरणातील वसुलीच्या प्रकरणात त्यांचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर धनंजय मुंडे यांनी गेल्या महिन्यात महाराष्ट्र मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता.