जेएनएन,मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने अखेर आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वंचितने आपले पत्ते उघडत 46 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीत काँग्रेससोबत युती करत निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे असतानाच, वंचितची उमेदवार यादी जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. सामाजिक न्याय, वंचित घटकांचे प्रश्न, झोपडपट्टी पुनर्विकास, पाणी, आरोग्य आणि शिक्षण हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवत वंचितने आपले उमेदवार निवडल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. अनेक प्रभागांमध्ये स्थानिक कार्यकर्ते, तरुण चेहरे आणि सामाजिक चळवळीशी जोडलेले उमेदवार देण्यात आले आहेत.
काँग्रेससोबतच्या युतीमुळे मुंबईतील लढत अधिक रंगतदार होणार आहे. महाविकास आघाडीच्या बाहेर राहून स्वतंत्र भूमिका घेणाऱ्या वंचितने यावेळी काँग्रेससोबत हातमिळवणी करत थेट भाजप आणि शिवसेना गटांना आव्हान देण्याची तयारी दर्शवली आहे. या युतीमुळे दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि वंचित समाजातील मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात एकजूट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची घोषणा करताना “मुंबई महापालिका ही फक्त प्रशासनाची नाही, तर सामान्य मुंबईकरांच्या हक्कांची लढाई आहे. वंचित बहुजन आघाडी ही शहरातील उपेक्षित घटकांचा आवाज बनून महापालिकेत काम करेल,” असे सांगितले. तसेच, विकासाच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि पारदर्शक कारभार हा वंचितचा प्रमुख अजेंडा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वंचितची यादी जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही प्रभागांमध्ये थेट तिरंगी किंवा चौरंगी लढती होण्याची शक्यता असून, त्याचा फटका मोठ्या पक्षांना बसू शकतो, अशी चर्चा आहे. उर्वरित उमेदवारांच्या याद्यांबाबतही लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे वंचितकडून संकेत देण्यात आले आहेत.
वंचित बहुजन आघाडी – मुंबई महानगरपालिका उमेदवारांची यादी (वार्डनिहाय)
- वार्ड 24 – सरोज दिलिप मगर
- वार्ड 25 – डॉ. सलीम अहमद रियाज अहमद अन्सारी
- वार्ड 27 – संगिता दत्तात्रय शिंगाडे
- वार्ड 38 – तेजस्विनी उपासक गायकवाड
- वार्ड 42 – रेवाळे मनिषा सुरेश
- वार्ड 53 – नितीन विठ्ठल वळवी
- वार्ड 54 – राहुल ठोके
- वार्ड 56 – ऊषा शाम तिरपुडे
- वार्ड 67 – पिर महमंद मुस्ताक शेख
- वार्ड 68 – पलमजित सिंह गुंबंर
- वार्ड 73 – स्नेहा मनोज जाधव
- वार्ड 76 – डॉ. परेश प्रभाकर केळुस्कर
- वार्ड 85 – अय्यनार रामस्वामी यादव
- वार्ड 88 – निधी संदीप मोरे
- वार्ड 95 – विनोद कुमार रामचंद्र गुप्ता
- वार्ड 98 – सुदर्शन पिठाजी येलवे
- वार्ड 107 – वैशाली संजय सकपाळ
- वार्ड 108 – अश्विनी श्रीकांत पोचे
- वार्ड 111 – अँड रितेश केणी
- वार्ड 113 – सुर्यकांत शंकर आमणे
- वार्ड 114 – सिमा निनाद इंगळे
- वार्ड 118 – सुनिता अंकुश वीर
- वार्ड 119 – चेतन चंद्रकांत अहिरे
- वार्ड 121 – दिक्षिता दिनेश विघ्ने
- वार्ड 122 – विशाल विठ्ठल खंडागळे
- वार्ड 123 – यादव राम गोविंद बलधर
- वार्ड 124 – रीता सुहास भोसले
- वार्ड 127 – वर्षा कैलास थोरात
- वार्ड 139 – स्नेहल सोहनी
- वार्ड 146 – सतिश वामन राजगुरू
- वार्ड 155 – पवार ज्योती परशुराम
- वार्ड 157 – सोनाली शंकर बनसोडे
- वार्ड 160 – गौतम भिमराव हराळ
- वार्ड 164 – आशिष प्रभु जाधव
- वार्ड 169 – स्वप्निल राजेंद्र जवळगेकर
- वार्ड 173 – सुगंधा राजेश सोंडे
- वार्ड 177 – कुमुद विकास वरेकर
- वार्ड 193 – भुषण चंद्रशेखर नागवेकर
- वार्ड 194 – शंकर गुजेटी (अशोक गुजेटी)
- वार्ड 195 – पवार ओमकार मोहन
- वार्ड 196 – रचना अविनाश खुटे
- वार्ड 197 – डोळस अस्मिता शांताराम
- वार्ड 199 – नंदिनी गौतम जाधव
- वार्ड 202 – प्रमोद नाना जाधव
- वार्ड 207 – चंद्रशेखर अशोक कानडे
- वार्ड 225 – विशाल राहुल जोंजाळ
हेही वाचा: मुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर; बंडखोरी शमवण्यासाठी स्वतः मैदानात
