जेएनएन, मुंबई. BMC Election Result 2026: बीएमसी निवडणुकीत मिळालेल्या जागानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देवाची इच्छा असली तर शिवसेनेचा महापौर होईल, असं ते म्हणाले. त्यांना भाजपाची भीती वाटत आहे. फुटलेले लोक कधीही फुटू शकतात. असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

मी जागांवर जाऊ शकलो नाही, त्या ठिकाणीच्या शिवसेना मतदारांची आणि उमेदवारांची मी दिलगिरी व्यक्त करतो, असं ठाकरे म्हणाले. 

आमचा महापौर होईल असा आकडा नसला तरी आमच्या पराभवाला तेज आहे. पण ज्यांची मदत घेऊन ते महापौर बसवण्यार आहेत, ते डागाळले आहेत. 

शिंदे यांचे नगरसेवक जर तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना पक्षात घ्याल का असा प्रश्न ठाकरेंना विचारण्यात आला यावेळी, ठाकरे यांनी हसत तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या असं उत्तर दिलं आहे.

मुंबईतील बलाबल

227 सदस्यीय बीएमसीमध्ये भाजपने 89 आणि मित्रपक्ष शिवसेनेने 29 जागा जिंकल्या, तर शिवसेनेने (यूबीटी) 65 आणि मनसेने सहा जागा जिंकल्या. वंचित बहुजन आघाडी (VBA) सोबत युती करून लढणाऱ्या काँग्रेसला 24 जागा मिळाल्या, AIMIM ला 8, राष्ट्रवादी काँग्रेसला 3, समाजवादी पक्षाला 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (SP) फक्त एक जागा मिळाली.