जेएनएन, मुंबई. राज्यात झालेल्या महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले आहेत. बीएमसीचेही सर्व निकाल समोर आले आहे. या निकालात ठाकरे बंधूंसाठी अस्तित्त्वाची लढाई असलेल्या महानगरपालिका मुंबई निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. तसेच ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळीतही ठाकरेंनी बाजी मारली आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपला गड राखला

वरळी विधानसभा क्षेत्रातील सात प्रभागांपैकी सहा प्रभागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवत स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी आपला गड राखला आहे. या मतदारसंघातील केवळ एका प्रभागामध्ये शिवसेना शिंदे  गटाच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दक्षिण मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघ हा अतिशय चुरशीचा मानला जात होता. 

या मतदारसंघात प्रभाग क्रमांक 193 ते 199 असे महानगरपालिकेचे सात प्रभाग येतात. या सात प्रभागांपैकी 

  • प्रभाग क्रमांक 193 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हेमांगी वरळीकर 
  • प्रभाग क्रमांक 194 मध्ये निशिकांत शिंदे, 
  • प्रभाग क्रमांक 195 मध्ये विजय भनगे,
  • प्रभाग क्रमांक 196 मध्ये पद्मजा चेंबूरकर, 
  • प्रभाग क्रमांक 198 मध्ये अबोली खाडे 
  • प्रभाग क्रमांक 199 मध्ये किशोरी पेडणेकर विजयी झाल्या आहेत.
  • तर प्रभाग क्रमांक 197 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वनिता नरवणकर यांनी मनसेच्या रचना साळवी या उमेदवाराला पराभूत करीत विजय मिळवला आहे. 

त्यामुळे या मतदारसंघात स्थानिक आमदार असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या सहाही उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे.     

    चारही माजी महापौर; तीन उपमहापौर विजयी 

    मुंबई शिवसेनेकडून (ठाकरे) माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, मिलिंद वैद्य व उप महापौर हेमांगी वरळीकर, सुहास वाडकर व अलका केरकर हे ती माजी उपमहापौर विजयी झाले आहेत.  

    माजी महापौर किशोरी पेडणेकर तत्कालीन महापौर होत्या. तर श्रद्धा जाधव, विशाखा राऊत, मिलिंद वैद्य विजयी झाले आहेत. तसेच उपमहापौर हेमांगी वरळीकर, सुहास वाडकर यांच्याही गळ्यात विजयाची माळ पडली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या या जेष्ठ आणि दिग्गज उमेदवारांनी आपआपला गड राखला आहे. प्रभाग 182 या प्रभागात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे मिलिंद वैद्य यांची ही चौथी निवडणूक होती.

    धारावीत भाजपला अपयश 

    मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत धारावी विधानसभा मतदारसंघातील एकही वॉर्ड भाजपाला जिंकता आला नाही. धारावीत काँग्रेसलाही फटका बसला असून या निवडणुकीत ठाकरे गटाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. तर मनसेला धारावीत एकही जागा जिंकता आली नाही. धारावी पुनर्विकासाचे वारे जोरदार सुरु आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भाजपा आग्रही आहे. त्यानुसार भाजपाने यंदा धारावीतून तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. यामध्ये काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले दोन दिग्गज नेतेही निवडणूक रिंगणात उतरले होते. यांनाही प्रचार केला. तसेच शिंदे गटानेही येथे जोरदार तयारीनिशी निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत धारावीत भाजपा आणि शिंदे गटाला यामध्ये अपयश आले.

    धारावी विधानसभा क्षेत्रातील निकाल

    • वॉर्ड 183- आशा काळे (काँग्रेस)
    • वॉर्ड 184 - साजिदाबी बब्बू खान (काँग्रेस)
    • वॉर्ड 185 - टी. एम. जगदीश (शिवसेना ठाकरे)
    • वॉर्ड 186 - अर्चना शिंदे (शिवसेना ठाकरे)
    • वॉर्ड 187 - जोसेफ कोळी (शिवसेना ठाकरे)
    • वॉर्ड 188 - भास्कर शेट्टी (शिवसेना शिंदे)
    • वॉर्ड 189 - हर्षला मोरे (शिवसेना ठाकरे)

    हेही वाचा - Maharashtra BMC Election Result: बीएमसीसह सर्व 29 महापालिकांचे निकाल जाहीर; सविस्तर वाचा एका क्लिकवर