जेएनएन, मुंबई. राज्यात मागील अनेक वर्षांपासून महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. अखेर आज मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील पालिंकाच्या निवडणुकांचा (BMC Election 2026) कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 

राज्य निवडणूक आयुक्तांनी केली घोषणा

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत सह्याद्री आथिती गृहात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर कार्यक्रम जाहीर (State Election Commissioner Press) केला आहे.

मुंबई महानगरपालिकेचा सविस्तर निवडणूक कार्यक्रम 

  • नामनिर्देशन दाखल - 23 डिसेंबर 2025
  • नामनिर्देशन अंतिम तारीख- 30 डिसेंबर 2025
  • छाणणी - 31 डिसेंबर 2025
  • नामनिर्देशन वापस - 2 जानेवारी 2026
  • निवडणूक चिन्ह - 3 जानेवारी 2026
  • मतदान - 15 जानेवारी 2026
  • मतमोजणी - 16 जानेवारी 2026

हेही वाचा - BMC Election 2026: मुंबई - पुण्यासह सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, आचारसंहिता लागू