जेएनएन, मुंबई. मुंबई महानगर पालिकाची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने मास्टरस्ट्रोक खेळला आहे. 2017 च्या निवडणुकीतलं गणित, बूथवरील आकडे, मतदारांची नव्या पद्धतीने झालेली रचना आणि सध्याची राजकीय परिस्थिती, हे सगळं एकत्र करून भाजपने नवा फॉर्म्युला तयार केला आहे.

भाजपचा गेमचेंजर फॉर्म्युला

2017 मध्ये शिवसेना अव्वल ठरली, भाजप जवळपास खांद्याला खांदा लावून दुसऱ्या क्रमांकावर होती. आता भाजपने त्याच निवडणुकीचा खोलवर अभ्यास करून,जिंकता येईल अशा जागांची अचूक आखणी केली आहे.

नवीन फॉर्म्युलानुसार शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात काही प्रभागांची सरळ अदलाबदल केली जाणार आहे. ज्याठिकाणी भाजपचा प्रभाव वाढला, ती जागा भाजप लढणार आहे. शिवसेनेच्या परंपरागत मजबूत किल्ल्यांमध्ये त्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. 

हा डेटा-बेस्ड फॉर्म्युला म्हणजे निवडणुकीत कोणी कुठे उभं राहिलं तर विजयाची शक्यता अधिक होईल याचा कोडबुक तयार केला आहे. 

अंतिम निर्णय दिल्ली घेणार

    भाजपचा संपूर्ण ‘विजय फॉर्म्युला’ आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. उच्च नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळताच उमेदवारांची पहिली यादी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते.

    मुंबई भाजपच्या कोअर कमिटीची बैठक लवकरच अपेक्षित आहे.