जेएनएन, मुंबई: मुंबई–ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचा दावा करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापवलं आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना–भाजप ची युती निश्चित असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र जागावाटपाच्या सूत्रांवर शिवसेना कोणताही तडजोडीचा मूड घेणार नसल्याचे संकेत शिंदेंनी दिले. “ज्या पक्षाचे माजी नगरसेवक अधिक, त्या पक्षाला जागाही त्यानुसार मिळाल्याच पाहिजेत,” अशी भूमिका शिंदे यांनी स्पष्ट केली.
120 जागांवर अप्रत्यक्ष दावा
मुंबई आणि ठाणे या दोन्ही महापालिकांमध्ये शिवसेनेकडे भाजपपेक्षा अधिक माजी नगरसेवक असल्याचा शिंदे यांनी म्हटल आहे. मुंबईत शिवसेनेकडे जास्त माजी नगरसेवकची संख्या असल्यामुळे 120 जागांवर अप्रत्यक्ष दावा शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या विधानानंतर युतीतील ताकद कोणाची जास्त, यावरून अंतर्गत संघर्ष पेटला आहे.
भाजपनंही मांडली भूमिका
शिंदेंच्या या दाव्याला उत्तर देत भाजपनंही आपली भूमिका मांडली. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई आणि ठाण्यात भाजपचे संघटन अधिक बळकट झाल्याचा दावा करत, स्थानिक पातळीवर भाजपकडेही मोठा जनाधार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आगामी जागावाटपाच्या चर्चेत फक्त जुने नगरसेवक नव्हे, तर सध्याचा राजकीय प्रभाव आणि जनाधारही विचारात घेतला जावा, अशी भूमिका भाजपने मांडली आहे.
युतीत जागावाटपावरून रस्सीखेच
दोन्ही पक्षांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर युतीत जागावाटपावरून रस्सीखेच वाढली आहे. महापालिका निवडणुका जवळ येत असताना शिवसेना–भाजप युतीमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या उच्च नेतृत्वाला नवी रणनीती आखावी लागणार आहे. आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे येणारा काळच सांगेल.
