जेएनएन, मुंबई. BMC Election 2025: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकसाठी महायुती आणि महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. महायुती मधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट एकत्र लढण्याची तयारी करत आहे. मात्र महाविकास आघाडीतील मित्र पक्ष एक दुसऱ्यावर टीका करत वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.
काँग्रेस पक्षाने निवडणुकीत एकला चलो ची भूमिका घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांची मोठी अडचण झाली आहे. समाजवादी पक्षाने काँग्रेस पक्षावर टीका करत वेगळा लढण्याची तयारी केली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे यांनी मात्र आपले पत्ते उघडले नाहीत. मात्र उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेऊन BMC निवडणूक लढण्याची एकत्र तयारी करत आहे. उद्धव ठाकरे यांच्या या खेळीने भाजपा आणि शिंदे गटाची मोठी फजिती होणार असल्याचे चित्र आहे.
महाविकास आघाडीच्या पक्षातील भूमिका
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथेला यांनी शरद पवार यांची भेट घेऊन निवडणुकीसंबंधी चर्चा केली आहे. चेन्निथेला यांच्या एकला चलोच्या भूमिकेने शरद पवार यांची BMC मध्ये मोठी अडचण होणार असल्याचे चित्र आहे.
समाजवादी पक्ष यांनी मुंबईतील BMC निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षावर समाजवादीने टीका केली आहे. काँग्रेस पक्षासोबत राहून यश मिळणार नाही म्हणून वेगळा लढण्याचा निर्णय समाजवादी पक्षाने घेतला आहे.
शिवसेना उद्धव गटने आपल्या महिला शाखेला मतदार याद्या तपासण्यासाठी जबाबदारी दिली आहे. नव्याने जोडले गेलेल्या नावांमध्ये चुकीचे किंवा चुकीचे प्रविष्ट नावे असू शकतात याचा तपास करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
महायुतीची तयारी?
भारतीय जनता पक्षाने उमेदवारीसाठी चाचपणी सुरू केली आहे. भाजपने 27 सदस्यांची छाननी समिती नियुक्त केली आहे. यामध्ये वॉर्ड-स्तरीय पुनरावलोकन करण्याची जबाबदारी आहे. या कमिटीकडून रिपोर्ट्स मिळाल्यानंतरच उमेदवारी-वाटपची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
शिंदे गटाची तयारी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी BMC निवडणुकांसाठी 21 सदस्यांची विशेष समिती तयार केली आहे. या समितीची पहिली बैठक आज पार पडली आहे. बैठकीत मतदारांशी संपर्क, मैदानात रणनीती, आणि पक्षांतर्गत सीट-वाटप यावर चर्चा केली आहे.
मुस्लिम मतावर सर्वांची नजर
AIMIM ने BMC निवडणुकांमध्ये किमान 50 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे मुस्लिम मतदात्यांना अनेक पक्षाचे पर्याय मिळणार आहे. यामध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव ठाकरे शिवसेना, समाजवादी पक्ष प्रमुख आहेत.
हेही वाचा - Cold Wave In Maharashtra: राज्यात कडाक्याची थंडी; या ठिकाणी सर्वात कमी तापमानाची नोंद, पुढील 24 तासांत…
