जेएनएन, मुंबई. House Arrest Show Controversy: बिग बॉस 7 चा माजी स्पर्धक एजाज खान पुन्हा एकदा त्याच्या स्पष्ट शो "हाऊस अरेस्ट" मुळे  वादात सापडला आहे. भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी या रिअॅलिटी शोवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी एजाज खानच्या शोवर टीका करत मंत्री अश्वीनी वैष्णव यांच्याकडे शोवर बंदी घालण्याची विनंती केली आहे.

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळीक देणे थांबवा. एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शोवर तात्काळ बंदी घाला. "स्वयंघोषित अभिनेता एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' या शोने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. उल्लू नावाच्या अ‍ॅपवर प्रसारित होणाऱ्या या शोच्या क्लिप्स आता सोशल मीडियावर उघडपणे व्हायरल होत आहेत, ज्या अत्यंत घृणास्पद आहेत.’ असे त्यांनी आपल्या X वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

‘मी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना उल्लू अ‍ॅपसह अशा आक्षेपार्ह सामग्री तयार करणाऱ्या सर्व अ‍ॅप्सवर तात्काळ बंदी घालावी अशी मी विनंती करते,’ असं त्यांनी म्हटलं आहे. 

अशा प्रकारचे शो केवळ आपल्या संस्कृतीचा अपमान करत नाहीत तर आपल्या समाजाच्या नैतिक आरोग्यावर देखील हल्ला करत आहेत. ते भविष्यातील पिढ्यांच्या मनावर विकृत हल्ला करत आहेत, अशी टीकाही त्यांनी हाऊस अरेस्ट या शोवर केली.

हेही वाचा - Maharashtra Weather Update Today: राज्यात उष्णतेची लाट, अनेक शहरात तापमान 40 अंशांवर; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील तापमान

    अॅप्सवर बंदी घालावी -प्रियंका चतुर्वेदी 

    मी स्थायी समितीमध्ये हे उपस्थित केले आहे की, उल्लू अॅप आणि अल्ट बालाजी सारख्या अॅप्सना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अश्लील सामग्रीसाठी असलेल्या अॅप्सवर बंदी घालावी. मी अजूनही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहे, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या X वर म्हटलं आहे.

    हेही वाचा - Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजना रद्द होणार? एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं…