जेएनएन, दापोली: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या सहाय्याने गावांचा सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो. या उद्दिष्टाने दापोलीत ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम (Minister Yogesh Kadam) यांच्या पुढाकाराने ग्रामप्रशासन तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनावर कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्य सहित अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते.
जागरण न्यू मीडियाच्या माध्यमातून AI कार्यशाळा पूर्व अडचणी जाणून घेतली. कार्यशाळेत योगेश कदम यांनी सांगितले की, ग्रामीण भागात सरपंचच्या माध्यमातून विकास होईल. AI ही काळाची गरज आहे, त्यासाठी सरपंच आणि सदस्यांना शिकणे आवश्यक आहे. भविष्यात गरज पडणार आहे, त्यासाठी आपण आज तयार असलो पाहिजे, असे प्रतिपादन योगेश कदम यांनी दृश्यप्रणालीद्वारे केले.
कार्यशाळेचा उद्देश!
ग्रामप्रशासनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पारदर्शकता, गती आणि कार्यक्षमतेत वाढ करणे, हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू आहे. AI च्या माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये अभिलेख व्यवस्थापन, निधी वितरण, नागरिक सेवा अर्ज प्रक्रिया, पाणीपुरवठा व्यवस्थापन, आणि कृषी विषयक निर्णय प्रक्रिया अधिक सुलभ व डेटा-आधारित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
कार्यशाळेतील महत्त्वाचे मुद्दे!
AI आधारित ग्रामविकास मॉडेल्सची ओळख:- गावांच्या लोकसंख्या, संसाधन, आणि गरजेनुसार विकास आराखडा तयार करण्यासाठी डेटा-अनालिटिक्स आणि AI कसे उपयुक्त ठरू शकते याचे सादरीकरण झाले.
डिजिटल ग्रामसेवा पोर्टल:- ग्रामपंचायतींच्या सर्व सेवांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.
स्मार्ट ग्राम निरीक्षण प्रणाली:- ग्रामस्तरावरील कामांची प्रगती, बांधकामे, जलसंधारण प्रकल्प आणि निधी वापर यावर रिअल-टाइम मॉनिटरिंगसाठी AI आधारित साधने वापरण्याची संकल्पना मांडण्यात आली.
नागरिक सहभाग:- ग्रामविकासात स्थानिक नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी मोबाईल ॲप व चॅटबॉट्सच्या वापरावर चर्चा झाली.