जेएनएन, मुंबई: महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे (Maharashtra Heavy Rains) ग्रामीण आणि शहरी भागात मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. राज्यातील मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Agriculture Minister datta Bharane) यांनी दिली आहे.
राज्यात सुमारे 20 लाख 12 हजार एकर क्षेत्रावरील पिकाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. शेतकरीच्या खरिप पीकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेत पाण्यामुळे जलमय झाले आहे. तर अनेकांची पिके पाण्यामुळे सडायला सुरुवात झाली आहे.
कोणत्या पिकांचं मोठं नुकसान!
पाण्यामुळे सोयाबीन, भात, मका, कापूस, तुरी या प्रमुख खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. भाजीपाला आणि फळबागांनाही मोठं नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे वाहून गेली, तर काही ठिकाणी पिके सडून गेल्याची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती भरणे यांनी दिली आहे.
प्रभावित जिल्हे!
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नद्यांना आलेल्या पूरामुळे शेतजमिनी जलमय झाल्या आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
सरकारकडून लवकरच मिळणार मदत !
नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना शासकीय मदत तातडीने मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विमा कंपन्यांशीही समन्वय साधून पीकविमा दाव्यांच्या प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. तर लवकरच शेतकऱ्याला मदत मिळणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री यांनी दिली आहे.
काँग्रेसची मागणी!
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला राज्य सरकारने लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी केली आहे.