जेएनएन, मुंबई. Organ Dononation : महाराष्ट्रात अवयवदानाबाबत जनजागृती आणि सकारात्मक बदल होत असूनही प्रत्यक्षात प्रत्यारोपणासाठी उपलब्ध अवयवांची कमतरता गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. विशेषतः मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपणाच्या बाबतीत परिस्थिती गंभीर आहे.

ब्रेन डेड अवयवदाते वाढले तरी गरज अपुरी -

राज्यात मागील काही वर्षांत मृत्यूजन्य (ब्रेन डेड) अवयवदात्यांची संख्या वाढली आहे. 2025 मध्ये राज्यभरातून 258 मृत्यूजन्य अवयवदाता नोंदवले गेले. ज्यांच्यामार्फत 713 अवयवांचे प्रत्यारोपण शक्य झाले. तरीही, प्रतीक्षा यादीतील रुग्णसंख्या प्रचंड असल्याने मागणी व पुरवठा यामध्ये मोठी दरी आहे.

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी सर्वाधिक मागणी -

झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) च्या अहवालानुसार, मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी राज्यात सर्वाधिक प्रतीक्षा आहे. सध्या महाराष्ट्रात तब्बल 8,963 रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत आहेत. केवळ एका मूत्रपिंडासाठी हजारो रुग्ण वर्षानुवर्षे प्रतीक्षा करत आहेत.

अडथळ्यांची प्रमुख कारणे-

    • अवयव साठवण आणि वाहतुकीसाठी  मर्यादित सुविधा. 
    • रुग्णालयांत प्रत्यारोपणासाठी लागणारी तांत्रिक यंत्रणा अपुरी.
    • वेळेत अवयव पोहोचवण्यात होणारा विलंब.
    • समाजात अवयवदानाबाबतची भीती आणि गैरसमज.

    काय आहे तज्ज्ञांचे मत!

    अवयवदानाबाबत जागरूकता वाढवतानाच, प्रत्यारोपण प्रक्रियेला गती देण्यासाठी आवश्यक सुविधा राज्यभर समान प्रमाणात उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत डॉ. आदेश गडपायले यांनी व्यक्त केले आहे. अवयवदाता वाढले तरी लाभार्थ्यांना वेळेत मदत मिळणे गरजेचे आहे यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देने काळाची गरज असल्याचे मत डॉ. आदेश गडपायले यांनी व्यक्त केले आहे.