एजन्सी,बीड: बीडमध्ये दुचाकीची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसशी धडक झाल्याने दोन पुरुषांचा मृत्यू झाला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
येळंब घाटातील घटना
ही घटना रविवारी संध्याकाळी मांजरसुंभा-अंबाजोगाई रस्तावरील येळंबघाट येथे घडली, असे त्यांनी पुढे सांगितले.
दोघांचा मृत्यू
"बस वसईहून अंबाजोगाईकडे चालली होती, तेव्हा केजकडून येणाऱ्या दुचाकीशी तिची समोरासमोर धडक झाली. येळंबघाट येथील रहिवासी राहुल सुरेश काळे (25) आणि केज तालुक्यातील विडा गावातील रहिवासी आकाश बापू पवार (25) यांचा जागीच मृत्यू झाला," असे अधिकाऱ्याने सांगितले.
गुन्हा दाखल
या अपघातात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
