जेएनएन, पुणे: स्वारगेटजवळील अपोलो हॉस्पिटलसमोर 'शिवाई' या इलेक्ट्रिक बसला आग लागली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

अग्निशमन अधिकारी प्रशांत गायकर यांनी सांगितले, "आम्हाला फोन आला आणि आमचे अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचले. तिथे पोहोचलो तेव्हा 'शिवाई' इलेक्ट्रिक बसला आग लागलेली होती. आमच्या अग्निशमन जवानांनी आग पूर्णपणे विझवली आणि 10 बॅटरी सुरक्षितपणे वाचवल्या. गाडीत 20 जण होते. ते सर्व प्रवाशी सुखरूप आहेत,"

हेही वाचा - Rahul gandhi Convoy Accident: राहुल गांधी यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर धडकल्या, कोर्टात जाताना झाला अपघात