जेएनएन, मुंबई. मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करणार आहेत. मराठा आंदोलकांनी होकार दिल्यानंतर मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असं मनोज जरांगे पाटील यांनी संगितलं. कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईत जायचंय जिंकून यायचंय आहे. समाजासाठी लढाई आहे.. कुणाला खुन्नस द्यायची नाही. गाड्या घेऊन निघालो तरी 2- 3 दिवस लागतील इतक्या गाड्या आहेत, असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
मराठा आंदोलकांच्या आत्महत्या विषयी बोलताना मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, आरक्षणासाठी समाजातील मुल स्वतःला संपवत आहेत. त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला मुंबईला जावे लागेल.
तर मराठे मतदान करणार नाहीत
“सरकारने आपल्याला अडवलं तर त्यांना मराठे मतदान करणार नाहीत. मराठ्यांनी मतदान नाही केलं तर सरकार पडेल. एखादा पोलीस जास्त शहाणपणा करायला लागला, आपल्याला कोणी पोलिसांनी अडवलं तर सगळं फडणवीसांवर येईल. मराठ्यांची मतं तोडतील एवढं सोपं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब तसं करणार नाहीत,” असं जरांगे यावेळी म्हणाले.
मुंबईत शांततेत आंदोलन करायचं - जरांगे पाटील
न्यायदेवतेनं आपल्या बाजूने कौल दिला आहे. ती गोरगरीबाच्या बाजूने आहे. आपण न्याय देवतेचा सन्मान करायचा. मुंबईत जाईपर्यंत आणि माघारी येईपर्यंत शांततेत आंदोलन करायचं. शांततेत आंदोलन करायचं. दगडफेक किंवा कोणतंही चुकीचं काम करायचं नाही. शांतता हा मार्ग स्वीकारायचा आणि कोणी काही केलं तर मी आंदोलन करणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले.
मुंबईला जाणाचा मार्ग सांगितला…
भरपूर समाज पाठीशी आहे, त्यामुळे मुक्काम वाढतात. पहिला मुक्काम पाटोदा, दुसरा मुक्काम श्रीगोंद्यात, तिसरा मुक्काम पुण्याच्या हडपसरमध्ये असणार आहे. चौथा मुक्काम खोपोलीत असणार आहे. आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे.
