जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Forecast: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसा अभावी पिकांनी माना टाकायला सुरूवात केली आहे. 

राज्यात या महिन्यात पावसाने चांगलीच दांडी मारली आहे. त्यामुळे राज्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. तर शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहे. सुरुवाताला उशिराने पावसाने सुरुवात केली जुलैमध्ये काही प्रमाणात कुठे जास्त तर कुठे कमी पाऊस झाला. आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतली आहे. आभाळ येत असल्यामुळे उन्हाचा चटकाही वाढला आहे. पाऊस कधी येणार या प्रश्नाने शेतकऱ्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, IMD ने पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट दिलेला नाही. 

आज या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

IMD नुसार राज्यात पुढील पाच दिवसांत कोणताही अलर्ट नाही आहे. अनेक भागात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, आज IMD ने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. यामध्ये सोलापूर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

शेतकऱ्यांची चिंता वाढली

मराठवाड्यात यंदा पावसाने काही प्रमाणात पाठ फिरवली आहे. काही भागात पाऊस खूप झाला आहे. तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. कमी पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या भागातील पिके माना टाकू लागली आहेत. आभाळामुळे ऊन ही वाढले आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन जास्त प्रमाणात होत असून जमीन तापू लागली आहे. त्यामुळे उकाड्याचे प्रमाणही वाढले आहे.