जेएनएन, नवी दिल्ली. Maharashtra Rain: राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मात्र, हवामान विभागाने पुढील दोन दिवसानंतर नंतर काही जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीकडून त्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज

आज उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट

राज्यात आज अनेक जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट

तर उद्या म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. IMD च्या इशाऱ्यानुसार, या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे. तसंच, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. 

    राज्यातील या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता

    16 ऑक्टोबर रोजी ठाणे, मुंबई भागात  उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, धाराशीव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. 

    मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता

    17 ऑक्टोबर रोजी ठाणे, मुंबई हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशीव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

    राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज

    18 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.