जेएनएन, मुंबई. महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 5000 रुपये ॲडव्हान्स देण्याची घोषणा केली. दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
दिवाळी आधी 5000 रुपये शेतकऱ्यांना अग्रीम देण्याचा निर्णय
आम्हाला कल्पना आहे दिवाळी येते आहे, दिवाळी अडचणीची आहे. दुष्काळाची कार्यप्रणाली दिवाळीआधी पूर्ण होणं कठीण आहे. दिवाळीआधी सगळी कामं होऊ शकत नाही. मात्र एकूणच सगळ्या गोष्टी विचारात घेता, आज मंत्रिमंडळाशी चर्चा केली आणि दिवाळी आधी 5000 रुपये शेतकऱ्यांना अग्रीम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सव्वा कोटी शेतकर्यांना मिळणार मदत
दिवाळीआधी 5000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. सुमारे एक ते सव्वा कोटी शेतकर्यांना मिळणार थेट खात्यात पैसे जमा होतील. ही अग्रीम मदत सुमारे 6000 कोटी रुपयांची असणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 40 तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, आता ही एकूण संख्या 305 झाली आहे.
🕛 11.55am | 14-10-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://t.co/DefG42hrnm
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 14, 2026
फडणवीसांनी केलेल्या मोठ्या घोषणा
- राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, आतापर्यंत 305 तालुके दुष्कळग्रस्त
- दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये अॅडव्हान्स देणार
- मराठवाड्यात भूजल पातळी 3 मीटरने खालावली, पिण्याच्या पाण्याचे टँकर वाढवणार
- 16 हजार अनधिकृत कनेक्शन कापले
- शैक्षणिक फी माफीच्या जीआरमधून अटी-शर्ती हटवल्या
- वीज बिलांसाठी कोणताही तकादा नाही, अतिउत्साह दाखवल्यास कारवाई
- कर्जवसुलीसाठीही बँकांनी अतिउत्साह दाखवू नये, खासगी बँका, मायक्रो फायनान्स कंपन्यांशी चर्चा करणार
- शेतकऱ्यांनी चारा किंवा चारा लागवड पीकं घ्यावीत, राज्य सरकार तो विकत घेणार
हेही वाचा - Maharashtra Cabinet Meeting: फडणवीस सरकारचे 3 मोठे निर्णय, PM मोदींच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर
