जेएनएन, मुंबई. Maharashtra Weather Update: राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु झाला आहे. आता श्रावण सुरु झाला आहे. श्रावणात रिमझिम पावसाच्या सरी बरसतात. त्यामुळे राज्यात मोठ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील पाच दिवसांत राज्यात कसे हवामान राहिल, याची माहिती घेऊया…

 17 ते 21 ऑगस्ट दरम्यान कसे राहील हवामान

राज्यात आज गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. येत्या पाच दिवसांत कोणत्याही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट नाही. त्यामुळे राज्यात मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे.

IMD ने जारी केलेल्या 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्टच्या रिपोर्ट नुसार या दिवसांत कोणत्याही जिल्ह्याला मुसळधार पावसाचा अलर्ट नाही. मात्र, अनेक जिल्ह्यांना हलक्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांच्या शेतमशागतीला वेग

राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी खरीप पिंकाच्या मशागतीसाठी गुंतला आहे. या काळात होण्याऱ्या रिमझिम पावसामुळे पिकांना मोठा फायदा होऊ शकतो.

    14 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद 

    राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये नंदुरबार, सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड, लातूर, जालना, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. येत्या काळात येथील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. या जिल्ह्यांतील पिकांच्या स्थितीवर आगामी काळातील पावसाचे प्रमाण निर्णायक ठरणार आहे.