जेएनएन, नवी दिल्ली. Nana Patekar Passed Away Live Update: गोव्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. त्यांना तीव्र हृदयविकाराचा झकटा आला होता. मणीपाल हॉस्पिटलच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
नाना पाटेकर यांनी रंगभूमीवरून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी 1978 प्रदर्शित झालेल्या गमन या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी काही मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये काम केले. त्यानंतर नाना पाटेकर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांना 1988 मध्ये आलेल्या ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटाने खरे ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले होते.
हेही वाचा - Nana Patekar Biography: विश्वनाथ दिनकर पाटेकर ते नाना पाटेकर; असा घडला अभिनयाचा ‘नटसम्राट’
हेही वाचा - महाराष्ट्रावर शोककळा, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- 2026-10-08 23:47:22
नाना पाटेकर अनंतात विलीन, डोणजे येथे झाले अंत्यसंस्कार
पुणे जिल्ह्यातील डोणजे येथील फार्महाऊसवर अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.VIDEO | Pune: Actor Nana Patekar cremated with full state honours at his farmhouse in Donje in Pune district.
(Full video available on PTI Videos - https://t.co/d8jp61yd2p) https://t.co/Ydjr0O5TlQ — Press Trust of India (@PTI_News) October 8, 2026 - 2026-10-08 09:46:00
नाना पाटेकरांचे पार्थिव मूळ गावी आणण्यात आले
नाना पाटेकर यांचे पार्थिव डोणजे गावात आणण्यात आले आहे. त्यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कार केले जातील. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित आहेत. जॅकी श्रॉफदेखील आदरांजली वाहण्यासाठी डोणजे गावात पोहोचले आहेत.#WATCH | Maharashtra: Mortal remains of veteran actor Nana Patekar brought to his native village, Donje village in Pune Rural. His last rites will be performed here. https://t.co/ztYWI1pUhV
— ANI (@ANI) October 8, 2026 - 2026-10-08 21:30:00
जॅकी दादा डोणजे गावात पोहोचले
दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना निरोप देण्यासाठी जॅकी श्रॉफ डोणजे गावात पोहोचले आहेत. त्यांच्या पार्थिवावर लवकरच शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.Pune, Maharashtra: Actor Jackie Shroff arrived at Donje village to attend the last rites of late veteran actor Nana Patekar https://t.co/BpfHBWgxSH
— IANS (@ians_india) October 8, 2026 - 2026-10-08 21:25:00
नानांचा मृतदेह गावात नेला जात आहे.
नाना पाटेकर यांचे पार्थिव पुणे विमानतळावरून डोणजे गावाकडे नेण्यात येत आहे. लवकरच अंत्यसंस्कार पार पडतील.Pune, Maharashtra: The mortal remains of late veteran actor Nana Patekar leaves from the Pune International Airport for Donje village, where his last rites will be performed. https://t.co/BGTpv3xdeP
— IANS (@ians_india) October 8, 2026 - 2026-10-08 20:49:00
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळावर नाना पाटेकर यांना आदरांजली वाहिली. नाना पाटेकर यांचे पार्थिव आता पुणे ग्रामीण येथील डोणजे गावातील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले आहे.
- 2026-10-08 20:37:00
पुण्यात आणण्यात आले नाना पाटेकर यांचे पार्थिव
नाना पाटेकर यांचे पार्थिव विमानाने पुण्यात आणण्यात आले आहे. त्यांच्या फार्महाऊसजवळ अंत्यसंस्कार पार पडतील. - 2026-10-08 19:30:00
'शेखर टुनाइट'मध्ये जाणार होते नाना पाटेकर
शेखर सुमन यांनी X हँडलवर ट्विट करून नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याने हे देखील उघड केले आहे की तो त्याच्या 'शेखर टुनाईट' या शोमध्ये एक दिवस आधी म्हणजेच 7 ऑक्टोबरला उपस्थित राहणार होता. मात्र, अभिनेत्याने ते काही दिवस पुढे ढकलले. शेखर पुढे म्हणाला, "काश त्याने हे केले नसते. तर मला शेवटच्या वेळी त्याला मिठी मारण्याची संधी मिळाली असती." - 2026-10-08 18:50:00
चाहत्यांनी दिला अखेरचा निरोप, पार्थिव फार्महाऊसवर आणण्यात आले
डोळ्यात अश्रू आणून चाहत्यांनी बांबोळीम येथील जीएमसी शवागारात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना अखेरचा निरोप दिला. तिथून नाना पाटेकर यांचे पार्थिव गोव्याहून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आले. त्यानंतर पुण्यातील नाना पाटेकर यांच्या 'नानाची वाडी' या फार्महाऊसवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.#WATCH | Goa: People pay their last respects to veteran actor Nana Patekar at GMC morgue in Bambolim. He passed away this morning. https://t.co/MfM2Xjt0kZ
— ANI (@ANI) October 8, 2026 - 2026-10-08 18:20:00
नाना पाटेकर यांच्यावर रात्री 9 ते 10 दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येईल
पुणे मिररच्या वृत्तानुसार, गोव्यात वैद्यकीय आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर नानांचे पार्थिव विमानाने पुण्यात पोहोचणे अपेक्षित आहे. सायंकाळी 6 वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी पोहोचणार असून रात्री 9 ते 10 या वेळेत त्यांना राज्य सन्मानाने अंतिम निरोप देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यात अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली आहे. - 2026-10-08 17:10:00
त्यांनी स्वतःच केली अंत्यविधीची तयारी
प्रसिद्ध छायाचित्रकार अतुल कासबेकर सांगतात की, नाना पाटेकर यांनी त्यांच्या अंत्यविधीची तयारी आधीच करून ठेवली होती. अतुल यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले, "त्यांनी मला त्यांच्या अंत्यविधीसाठी तयार केलेला लाकडांचा ढिग दाखवला. त्यांनी सांगितले की, त्यांनी लाकडे कोरडी ठेवली होती, कारण ओल्या लाकडांना धूर येतो आणि त्यांच्या अंत्यविधीला आलेल्या लोकांच्या डोळ्यात धूर जाऊन त्यांनी रडावे असे त्यांना वाटत नव्हते! फक्त नानासाहेबच आपल्या अंत्यविधीला एक विनोदी प्रसंग बनवू शकले असते. एक जबरदस्त अभिनेते. एका पिढीचा आवाज. एक प्रभावशाली व्यक्तिमत्व. आणि त्या रुबाबदार बाह्यरूपामागे, एक अत्यंत उदार आणि दयाळू माणूस होता." - 2026-10-08 15:57:11
नाना पाटेकर यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार
'गोवा न्यूज हब'च्या वृत्तानुसार, नाना पाटेकर यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी पुण्याला नेण्यापूर्वी, अंतिम दर्शनासाठी गोव्यातील जीएमसी (GMC) येथे काही काळासाठी ठेवले जाईल. - 2026-10-08 15:16:44
रुग्णालयात पोहोचला मल्हार, थोड्याच वेळात कुटुंबीयांकडे सोपवणार पार्थिव
नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार गोव्यातील रुग्णालयात पोहोचला आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत असताना त्याने डॉक्टर आणि कुटुंबीयांची भेट घेतली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाना पाटेकर यांचे पार्थिव कुटुंबीयांकडे सोपवले जाईल. - 2026-10-08 13:15:41
शरद पवार गोव्यात पोहोचले
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार हे दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत. - 2026-10-08 13:13:51
नाना पाटेकर यांच्या निधनावर तनुश्री दत्ता म्हणाली… ‘परिस्थिती समजून प्रतिक्रिया देईन’
तनुश्री दत्ताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली, "मला ती बातमी समजली. आज माझा कामाचा दिवस आहे आणि मला त्यावरच लक्ष केंद्रित करायचे आहे. ही घटना घडण्यासाठी आजचा दिवस किती विचित्र आहे. मी लखनौमध्ये एका मोठ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे आणि तो कार्यक्रम माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे; माझा संपूर्ण दिवस त्याभोवतीच नियोजित आहे. "माझी 'लाईव्ह' जाऊन अपडेट्स देण्याची योजना होती. पण आता मला अशी काळजी वाटतेय की, संध्याकाळपर्यंत प्रसारमाध्यमे या 'इव्हिल डेड' (Evil Dead) व्यक्तीच्याच बातम्यांमध्ये व्यस्त असतील; त्यामुळे परिस्थिती समजून घेतल्यानंतरच मी माझी प्रतिक्रिया देईन. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे." - 2026-10-08 12:44:03
नाना पाटेकर जमिनीशी जोडलेले व्यक्तिमत्त्व - सचिन तेंडूलकर
नाना पाटेकर यांची आठवण एक अत्यंत स्पष्टवक्ते आणि जमिनीशी जोडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून येते. त्यांच्या कामातही तीच प्रामाणिकपणा दिसून येत असे. मराठी असो वा हिंदी, त्यांनी साकारलेल्या प्रत्येक पात्रात त्यांनी नेहमीच एक जिवंतपणा आणला. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि आप्तेष्टांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती, असे ट्वीट करून माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.I remember Nana Patekar as a very straightforward and grounded person. His work had that same honesty to it. Whether it was in Marathi or Hindi, he always brought something very real to the characters he played.
Very sad to hear about his passing. My condolences to his family and loved ones. Om Shanti. — Sachin Tendulkar (@sachin_rt) October 8, 2026 - 2026-10-08 12:32:13
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही पाटेकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान व सामाजिक कार्याप्रती असलेली त्यांची निष्ठा यांचे स्मरण केले. "ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. आपल्या प्रभावी आणि भावपूर्ण अभिनयातून त्यांनी मानवी अनुभवांचे विविध पैलू जिवंत केले. त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी लोकांच्या मनावर आणि हृदयावर कायमस्वरूपी ठसा उमटवला. त्यांची समाजसेवेची तळमळ ही वंचितांविषयीची त्यांची आस्था दर्शवणारी होती. त्यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. मी त्यांचे कुटुंबीय आणि चाहते यांच्याप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते," असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 'एक्स' (X) वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. - 2026-10-08 11:15:42
नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी पुणे जिल्ह्यातील त्यांच्या फार्महाऊसवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यातील निवासस्थानी निधन झाले. "त्यांचे पार्थिव सायंकाळी 5 वाजेपर्यंत (पुण्याला) आणले जाईल आणि त्यानंतर ते अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल. त्यांच्या फार्महाऊसच्या आवारातच अंत्यसंस्कार केले जातील," असे पाणी संवर्धनासाठी काम करणाऱ्या पाटेकर यांच्या 'नाम फाउंडेशन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गणेश थोरात यांनी सांगितले. - 2026-10-08 10:23:46
नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल रजनीकांत यांनी व्यक्त केला शोक
आपल्या अष्टपैलू अभिनयासाठी आणि पडद्यावरील प्रभावी उपस्थितीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल सुपरस्टार रजनीकांत यांनी शोक व्यक्त केला.
- 2026-10-08 10:20:49
नानांचा आनंदानं नाचतानाचा व्हिडिओ
Nana Patekar Video: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. गेल्या रविवारी गोव्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती; त्यावेळचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नाना पाटेकर हे आनंदाने नाचताना आणि वाद्य वाचताना दिसत आहेत. सविस्तर वाचा - नाना पाटेकरांचा गोव्यातील कार्यक्रमाचा शेवटचा Video, आनंदानं नाचत होते नाना, म्हणाले.. मला नटचं व्हायचे… - 2026-10-08 09:58:39
शेतकरी व वंचितांविषयीची त्यांची तळमळ सदैव स्मरणात राहील - मल्लिकार्जुन खरगे
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख झाले आहे. त्यांचा उत्कृष्ट अभिनय, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे अफाट व बहुआयामी योगदान आणि शेतकरी व वंचितांविषयीची त्यांची तळमळ सदैव स्मरणात राहील. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहते यांच्याप्रती मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो, अशी शोकभावना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली आहे. - 2026-10-08 09:48:59
महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान हरपला - एकनाथ शिंदे
रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या व प्रखर सामाजिक जाणिवा जपणाऱ्या नाना पाटेकर यांचे अकल्पित निधन हा चित्रपटसृष्टीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. गेल्याच आठवड्यात अनंत चतुर्थीच्या दिवशी नानांच्या पुण्याच्या घरी गणपती दर्शनाच्या वेळेस झालेली भेट ही शेवटची ठरली, अशी शोकभावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करताना नानांच्या आठवणींना उजाळा दिला. - 2026-10-08 09:45:32
nana patekarयांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायी - शरद पवार
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले आहे. आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्या संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेतील विलक्षण सहजतेने त्यांनी रसिकांच्या मनावर कायमची अमिट छाप उमटवली. परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, वेलकम, नटसम्राट अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना अनुभवायला मिळाले.ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले आहे. आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्या संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेतील विलक्षण सहजतेने त्यांनी रसिकांच्या मनावर कायमची अमिट छाप उमटवली. परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, वेलकम, नटसम्राट अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना अनुभवायला मिळाले.
कलाकार म्हणून यशस्वी असतानाच सामाजिक प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली कृतिशील समाजसेवा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तितकाच प्रेरणादायी पैलू होता. त्यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वाने एक संवेदनशील आणि प्रतिभावान कलाकार, तर समाजाने एक कृतिशील व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या अभिनयाची, विचारांची आणि सामाजिक कार्याची अमिट छाप सदैव स्मरणात राहील. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! — Sharad Pawar (@PawarSpeaks) October 8, 2026 - 2026-10-08 09:42:53
माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी - देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ‘परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत 'नाम फाऊंडेशन'ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.’ असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. - 2026-10-08 09:32:49
Nana Patekar Dead: सयाजी शिंदे पोहोचले गोव्यात
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले आहे. "ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. यावर आता काय बोलावे, हेच मला सुचत नाहीये. मला सकाळी 7 च्या सुमारास ही बातमी समजली. मी कुडाळमध्ये शूटिंग करत होतो, त्यामुळे स्वतः खात्री करण्यासाठी मी तातडीने गोव्याला आलो. मला या बातमीवर विश्वासच बसत नव्हता आणि ती खरी आहे की खोटी, असा प्रश्न मला पडला होता. म्हणूनच मी इथे आलो..." असे अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले. - 2026-10-08 09:28:22
Nana Patekar News - नाना पाटेकरांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि त्यांची अभिनयातील प्रखरता, अष्टपैलूत्व तसेच हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाची प्रशंसा केली.Prime Minister Narendra Modi expressed deep condolences over the passing of legendary actor Nana Patekar, praising his intensity, versatility, and contributions to Hindi and Marathi cinema.
In his tweet, he wrote, "Few actors possessed the intensity, individuality, and unmistakable presence that Shri Nana Patekar Ji had. He brought remarkable versatility and creativity to every role and gave us characters that will be remembered for generations. He was also admired for his frank and forthright views, never hesitating to express what he believed in. Shri Nana Patekar’s contribution to Hindi and Marathi cinema was immense. His passing leaves a deep void. My condolences to his family, friends, and countless admirers. Om Shanti." — ANI (@ANI) October 8, 2026
