एजन्सी, लातूर: लातूर जिल्ह्यात एका तरुणाला विवस्त्र करून पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तसंच, त्याच्या गुप्तांगावर पेट्रोल ओतल्याचे एका व्हायरल व्हिडिओमध्ये कथितपणे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे, असे एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.
हा कथित गुन्हा एमआयडीसी (MIDC) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे, असे त्यांनी सांगितले.
प्राथमिक चौकशीवरून असे दिसून येते की, ही घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. या गंभीर मारहाणीनंतर पीडित तरुण तेथून निघून गेला होता.
पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवली असून त्याला आपला जवाब नोंदवण्यासाठी पुढे येण्याची विनंती केली आहे, असे सांगून अधिकाऱ्याने सांगितले की, एवढ्या गंभीर मारहाणीनंतरही तो स्वतःहून पोलिसांशी संपर्क साधायला आला नव्हता.
आरोपींनी पीडिताला विवस्त्र केले, त्याला पट्ट्याने मारहाण केली आणि लाथा-बुक्क्यांनी तुडवले, त्यानंतर त्याच्या गुप्तांगावर पेट्रोल ओतले. त्यांनी या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलवर शूट केला आणि तो सोशल मीडिया ग्रुप्सवर व्हायरल केला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
"हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आम्ही तपास सुरू केला आहे. पीडिताचा जवाब नोंदवल्यानंतरच घटनेचा नेमका क्रम आणि इतर तपशील समोर येण्याची शक्यता आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले.
