मुंबई. Ladki Bahin Yojana Disqualified Woman: 'लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत 68 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी नियमांचे पालन न केल्यामुळे 68 लाख 'लाडकी बहीण' खाती बंद करण्यात आली आहेत. महायुती सरकारच्या 'लाडकी बहीण' या महत्वकांक्षी योजनेअंतर्गत जवळपास 68 लाख खाती बंद करण्यात आली आहेत, कारण लाभार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी अनिवार्य ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सक्रिय खात्यांची संख्या1.75 कोटी होती.

यानंतर, सक्रिय खात्यांची संख्या अंदाजे 1.75 कोटींपर्यंत कमी झाली आहे. तथापि, ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 मार्चवरून वाढवून 30 एप्रिल करण्यात आली आहे. या अपडेटनंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूर्वी बंद केलेल्या खात्यांसाठी ई-केवायसी पूर्ण केल्यास एकूण खात्यांच्या संख्येत बदल होऊ शकतो.

अपात्र महिला लाभार्थी शोधण्याची मोहीम तीव्र -

या योजनेत 2 कोटी 43 लाख महिलांनी नोंदणी केली होती आणि त्यांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळत होती. त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा बोजा येत होता. अन्य योजनांसाठी निधी कमी पडत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. 

सरकारवरील अर्थभार कमी होणार -

    ई-केवायसीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत दिलेल्या मुदतीत 1 कोटी 75 लाख महिलांनी केवायसी पूर्ण केले. तर, उर्वरित 68 लाख महिलांनी केवायसी केले नाही. त्यामुळे त्या अपात्र ठरल्या. आता त्यांना दरमहा 1,500 रुपये लाभद्यावा लागणार नाही. त्यामुळे सरकारचे वर्षाला 12,240 कोटी रुपये वाचणार आहेत.

    तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली-

    या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, एकूण 2.43 कोटी खात्यांपैकी, अंदाजे 68 लाख  खाती विहित वेळेत अनिवार्य ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे बंद करण्यात आली आहेत. अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने ही पडताळणी मोहीम सुरू केली.

    यावर्षी 26,000 हजार कोटी रुपयांचे वाटप-

    या योजनेअंतर्गत, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना सरकारकडून दरमहा ₹1,500 चा भत्ता मिळतो. राज्य सरकार या उद्देशासाठी दरमहा अंदाजे ₹3,700 कोटींचे वाटप करते.