जेएनएन, मुंबई. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आले आहे. 

74 टक्के तालुके दुष्काळाच्या कक्षेत

265 तालुक्यांचा आकडा अधिकृत शासन निर्णयात कायम राहिला आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे 74 टक्के तालुके दुष्काळाच्या कक्षेत आले आहेत. त्यामुळे मोठ्या दुष्काळाची तीव्रतेचा दिसून येत आहे.

विभाग निहाय तालूक्यांची संख्या, सर्वाधिक मराठवाड्यात...

दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमध्ये राज्यातील विविध महसूल विभागांतील तालुक्यांचा समावेश आहे. ठाणे महसूल विभागातील 12, नाशिक विभागातील 49, पुणे विभागातील 35, छत्रपती संभाजीनगर विभागातील 74, अमरावती विभागातील 56 आणि नागपूर विभागातील 39 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे.

राज्यातील सहा महसूल मंडळातील दुष्काळ घोषित झालेली तालूके…  

    महसूल विभागजिल्हाप्रथम कळ (Trigger-1) लागू झालेले तालुके (तालुक्यांची नावे)तालुक्यांची संख्या PDF
    कोकणठाणेनिरंक0
    पालघरनिरंक0
    रायगडश्रीवर्धन1
    रत्नागिरीरत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर3
    सिंधुदुर्गसावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला8
    नाशिकनाशिकमालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा10
    धुळेधुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर4
    जळगावएरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल15
    नंदुरबारअक्कलकुवा, शहादा, नंदूरबार, नवापुर, तळोदा, अक्राणी6
    अहिल्यानगरनगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपुर, रहाता14
    पुणेपुणेभोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर8
    सोलापूरउ. सोलापूर, द. सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा11
    सांगलीमिरज, आटपाडी, जत, कवठेमहाकाळ4
    सातारासातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर6
    कोल्हापूरपन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड6
    छ. संभाजीनगरछ. संभाजीनगरछ. संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री9
    जालनाबदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद8
    बीडबीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी11
    लातूरलातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरुरअनंतपाळ, देवणी, जळकोट10
    धाराशिवधाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा8
    नांदेडनांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलुर, किनवट, हिमायतनगर, माहुर, धर्माबाद, उमरी, अर्धापुर, नायगाव14
    परभणीपूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी9
    हिंगोलीहिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत5
    अमरावतीबुलढाणाजळगावजामोद, संग्रामपुर, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, बुलडाणा, शिंदेखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापुर, मोताळा, नांदुरा13
    अमरावतीअमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खं., धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदुरबाजार, दर्यापुर14
    अकोलाअकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तीजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी7
    वाशिमवाशीम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, मानोरा6
    यवतमाळयवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी जामणी, केळापुर, घाटंजी, राळेगाव16
    नागपूरवर्धावर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी7
    नागपूरनागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर14
    भंडाराभंडारा, पवनी, लाखंदूर3
    गोंदियातिरोडा1
    चंद्रपूरचंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजूरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभिड, सिंदेवाही, पोंभुर्णा12
    गडचिरोलीगडचिरोली, चार्मोर्शी2
    एकूणएकूण तालुके265