जेएनएन,  'लालबागचा राजा'चं विसर्जन संपन्न झालं असून अत्याधुनिक तराफ्यावरुन खोल समुद्रात जात लाडक्या राजाचं विसर्जन करण्यात आलं आहे.

गिरगाव चौपाटीवर 'लालबागचा राजा'ची आरती संपन्न झाली त्यानंतर 'लालबागचा राजा'च्या विसर्जनाचा अंतिम टप्पा सुरू झाला. 'लालबागचा राजा'ची मूर्ती अत्याधुनिक बार्जवर ठेवण्यात आली नंतर पाणी वाढताच बार्जला खोल समुद्रात नेण्यात आले.

कफ परेड आणि कुलाब्यातील कोळी बांधव मोठ्या संख्येनं गिरगाव चौपाटीवर त्यांच्या बोटींसह आले होते. त्यांनी वाजत गाजत विसर्जनाचा अंतिम टप्पा सुरू केला. खोल समुद्रात नेऊन 'लालबागचा राजा'चं विधिवत विसर्जन करण्यात आले.