जेएनएन, मुंबई. Marathwada Rain Alert: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर आहेत. काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 

मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज

मराठवाड्यातील नागरिकांना उन्हापासून थोडाचा दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. येत्या चार दिवसांत मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यात विषेशतः मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली

मराठवाड्यात सध्या ज्वारी, हरभरा, गहू, बाजरी ही पिके काढणीला आली आहेत, तर काही ठिकाणी काढणी सुरु आहे. त्यामुळे वातावरणात झालेल्या बदलाने मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीपचे पिकही अतिवृष्टीने गेलं होतं आता रब्बीच्या पिकावरही अवकाळी पावसाची टांगती तलवार आहे. जर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला तर शेतकऱ्यांच्या तोंडांशी आलेला घास पुन्हा हिसकवण्याची भिती आहे.

आज या जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    तर हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस सांगितला आहे. 

    मराठवाड्यातील पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज 

    16 मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट (16 March Weather Update)

    हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

    17 मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट (17 March Weather Update)

    नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

    18 मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट (18 March Weather Update)

    हिंगोली, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

    19 मार्च रोजी या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट (19 March Weather Update)

    हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.