जेएनएन, लातूर: मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले (Latur Crop Damage) आहे.

लातूर जिल्ह्यात 2 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

लातूर जिल्ह्यातील नुकसानीची आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यात सुमारे दोन लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे जवळपास तीन लाख शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

327 जनावरे मृत्यूमुखी

शेतकऱ्यांच्या मेहनतीचे पीक पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. याशिवाय अतिवृष्टीमुळे 600 हून अधिक घरे कोसळली असून, शेकडो कुटुंबे बेघर झाली आहेत. पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये सुमारे 327 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुप्पट संकट कोसळले आहे. 

सर्वाधिक नुकसान अहमदपूर तालुक्यांमध्ये 

    दरम्यान प्रशासनाने नुकसानीचा प्राथमिक पंचनामा करून अहवाल सादर केला आहे. सर्वाधिक नुकसान अहमदपूर आणि उदगीर तालुक्यांमध्ये झाले आहे. याठिकाणी अनेक गावे पावसामुळे बाधित झाली आहेत.

    या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहे.तर, नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतकरी शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

    असा आहे पंचनामा अहवाल!

    • 2.75 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान!
    • 3 लाख शेतकरी प्रभावित!
    • 600 घरे पडझडीत उद्ध्वस्त!
    • 327 जनावरे दगावली!
    • अहमदपूर व उदगीर तालुके सर्वाधिक बाधित!

    हेही वाचा - Nagpur News: नागपूर-दिल्ली विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल; एअर इंडियाचे विमान आता सकाळी घेणार उडाण