जेएनएन, बीड: गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चार दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.तर अनेक शेतं पाण्याखाली गेली आहेत.
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान!
सोयाबीन, कापूस, मका या प्रमुख पिकांना फटका बसला आहे.तर अनेक ठिकाणी पिकं पूर्णपणे सडून गेली आहेत.शेतकऱ्यांनी केलेला सर्व खर्च वाया गेला असून पुन्हा बियाणे घेऊन पेरणी करण्याची हिंमत नाही.
बीड परिसरातील स्थिती!
बीड शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम आहे.
माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांतील शेतजमिनींमध्ये पाणी साचले आहे.
कोथरूडसह अनेक गावांच्या शेतांमध्ये अजूनही पाणी साचलेले आहे. पुरामुळे शेतकऱ्यांना शेतात प्रवेश करणेही कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांची बिकट अवस्था!
पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.तर मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.हजारो शेतकऱ्यांचे पिकं वाहून गेली तर काहीचे पिके पाण्याखाली जाऊन सडल्याने आतोनात नुकसान झाले आहे.
काही शेतकऱ्यांकडे पुन्हा पीक घेण्यासाठी साधनसामग्री किंवा आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.
राज्यातील परिस्थिती!
महाराष्ट्रात फक्त बीड जिल्हाच नाही तर राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतीसह घरगुती आणि सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे.
शेतकऱ्याची मदतची मागणी!
शेतकरी संघटना,स्थानिक शेतकरी आणि नागरिकांकडून सरकारने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे .
हेही वाचा: Maharashtra News: मराठा समाजाला आरक्षणसाठी उपसमितीचं पुनर्गठन ; राधाकृष्ण विखे पाटील यांना अध्यक्षपद