जेएनएन, धाराशिव. Tuljapur Drug Case: ड्रग्जच्या विरोधात राज्य सरकारची मोहीम सुरू असतानाच ड्रग्ज थेट तुळजापूर मंदिरात पोहचले आहे. तुळजापूर मंदिरातच ड्रग्ज तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आरोपी पुजाऱ्यांवर कायमची प्रवेश बंदी!
ड्रग्ज तस्करीत मंदिरातील 11 पुजाऱ्यांची नावे समोर आली आहे. ड्रग्ज तस्करीमध्ये पुजारीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. मंदिर संस्थानने आरोपी पुजाऱ्यांवर कायमची प्रवेश बंदी केली जाणार असून मंदिर संस्थांचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी यांनी आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे.
तुळजापुरात मागील 3 वर्षांपासून ड्रग्ज तस्करी सुरु
यादीत पुजारीसहित काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात मागील 3 वर्षांपासून ड्रग्ज तस्करी सुरु असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई कठोर केली आहे. पुजारीसोबत असलेल्या राज्यभरात पसरलेल्या लोकांचा शोध पोलिसकडून घेत आहे. पोलिसने केलेल्या तपासात तुळजाभवानी मंदिरातील पुजारी सोबत इतर देवस्थानमधील पुजारी आणि राजकीय कार्यकर्तेचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - Mumbai News: तमाशा कलावंतासमोरील आव्हानांचा अभ्यास करण्यासाठी तज्ञांची समिती होणार स्थापन
ड्रग्ज तस्करीमध्ये आरोपी पुजाऱ्यांची नावे वाढण्याची शक्यता
या प्रकरणात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजा यांनी पोलिसांना पत्र देऊन तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. ही यादी प्राप्त होताच ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी पुजाऱ्यांवर कायद्यानुसार कायमची मंदिर प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. ड्रग्ज तस्करीमध्ये आरोपी पुजाऱ्यांची नावे वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.