एजन्सी, पुणे. Pune Mumbai Expressway Fire News: पुण्यातील दापोडी परिसरात मुंबई-पुणे जुन्या एक्सप्रेसवेवर मंगळवारी एका कारला आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागानेही घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कार जळतानाचा व्हिडिओ आला समोर 

पुणे-मुंबई एक्सप्रेसवे वर ही कार जळतानाचा व्हिडिओ समोर आला असून यामध्ये कार पूर्णपणे आगीच्या तडाख्यात आली होती. व्हिडिओत गाडी आगीमुळे जळून खाक झाल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा - Mumbai Suicide Case: लग्नाच्या 2 महिन्यांतच विवाहितेची आत्महत्या, घरातील पंख्याला घेतला गळफास

    इंजिन जास्त गरम झाल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज 

    दरम्यान, या आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे. इंजिन जास्त गरम झाल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. गाडीतील नागरिक गाडीनं आग पकडण्याच्या आधी कारमधून खाली उतरल्यानं मोठा अनर्थ टळला आहे.

    गाडीची काळजी घ्या.

    सध्या उन्हाळा सुरु असून जास्त काळ गाडी चालवल्यामुळे गाडीचे इंजिन गरम होण्याची शक्यता असते. यामुळे गाडीचे इंजिन थंड करण्यासाठी काही काळ गाडी सावलीत थांवण्याचा सल्ला तज्ञ देतात. आपण योग्य प्रकारे गाडीची काळजी घेतली तर तुम्हाला तसंच, तुमच्या गाडीला इजा होण्याची शक्यता कमी आहे.