परतूर: संपूर्ण जालना जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या परतूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपच्या प्रियंका राक्षे विजयी झाल्या आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार शांताबाई हिवाळे यांचा पराभूत केलं आहे.
परतूर नगरपालिकेत कुणाचे किती नगरसेवक विजयी?
- भाजपा: 06
- राष्ट्रवादी (शरद पवार गट): 06
- राष्ट्रवादी (अजित पवार गट): 05
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 03
- शिवसेना (ठाकरे गट): 03
कोणत्या प्रभागात कोण विजयी?
- प्रभाग 1: भाजपच्या सोनोने रत्नमाला आणि 1 ब मधून भाजपचेच कुरेशी शेख इमरान मुन्सी विजयी झाले.
- प्रभाग 2: राष्ट्रवादी (श. प.) चे ऋषिकेश कऱ्हाळे विजयी झाले, तर 2 ब मध्ये भाजपच्या स्नेहा अग्रवाल विजयी.
- प्रभाग 3: राष्ट्रवादीचे खतीब शाकीरोद्दीन तर प्रभाग 3 ब मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काजी तय्यबा फातेमा विजयी.
- प्रभाग 4: मध्ये काँग्रेसचे अन्सारी रुबीना मोहम्मद मुस्ताक आणि काँग्रेसचे शेख कादिर अब्दुल्ला विजयी
- प्रभाग 5: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सय्यद तहसीन बेगम विजयी, तर 5 ब मध्ये काँग्रेसचे कुरेशी रज्जाक लतीफ विजयी.
- प्रभाग 6 : प्रभाग 6 अ मध्ये राष्ट्रवादी (श. प.) च्या शीला राऊत तर 6 ब मध्ये भाजपचे प्रकाश चव्हाण विजयी झाले.
- प्रभाग 7: मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शेख तौसिफ़ सज्जाद आणि सरस्वती तेलगड विजयी
- प्रभाग 8: अ मध्ये भाजपचे डॉ. प्रदीप सातोनकर तर 8 ब मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विशाखा राखे यांनी विजयी.
- प्रभाग 9: प्रभाग 9 मध्ये भाजपच्या पूजा काळे आणि शिवसेना (ठाकरे गट) चे गणेश नळगे विजयी झाले.
- प्रभाग 10: प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कल्पना डहाळे, शिवसेना (ठाकरे गट) च्या मिरा कदम आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश खंडेलवाल विजयी झाले.
- प्रभाग 11: मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबू नाथा हिवाळे आणि शिवसेना (ठाकरे गट) च्या माधवी संतोष पवार विजयी.
