जेएनएन, बीड. Beed Latest News: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी बीडच्या कारागृहात आहे. त्याच कारागृहात बबन गीते समर्थकांनी कारागृहात हाणामारी केली आहे.
कैदी एकमेकांना भिडले
सकाळच्या सुमारास कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली असून बीड जिल्हा कारागृहात सकाळच्या वेळी बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडले असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्यानंतर बीडच्या गुंडगिरी आणि दहशत संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान बीडच्या जिल्हा कारागृहातून मोठी बातमी समोर आली आहे.
कारागृहातला हा राडा नेमका कशामुळे झाला?
बीडमध्ये दोन गटात राडा झाला असून बीड जिल्हा कारागृहात सकाळच्या वेळी बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडले होते. याच कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपी आहेत. कारागृहातला हा राडा नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.
हेही वाचा - Aurangzeb Tomb Row: औरंगजेबाच्या कबरीचा फोटो अन् आक्षेपार्ह टिप्पणीसह स्टेटस, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बबन गीते समर्थक आणि कैद्यात हाणामारी
संतोष देशमुख हत्या प्रकरण नंतर परळीत गोळीबार घटनेत फरार असलेले आरोपी बबन गीते याच्या समर्थक कैदी विरोधी गटातील कैद्यांना भिडल्याची माहिती समोर आली आहे. गीते समर्थक आणि विरोधी गटात जोरदार हाणामारी झाली असल्याची घटना समोर आली आहे. दोन गटात हाणामारी दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड जवळच असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - Actress Krutika Chaudhary Murder Case: 8 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर आरोपींची पुराव्यांभावी निर्दोष सुटका
संपूर्ण घटनेचा तपास सुरू
दोन गटात हाणामारीमधील जखमी कैद्यांची डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे. दरम्यान, तुरुंग प्रशासनाने या संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आहे. कारागृहातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडेकोट करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केले जात आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासन अनेक उपायोजना करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.