एजन्सी, ठाणे. Aurangzeb Tomb Photo Post: छत्रपती संभाजीनगरमधील मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीजवळ स्वतःचा कथित फोटो आणि समाजात तेढ निर्माण करणारी टिप्पणी समाज माध्यमांवर पोस्ट केल्याच्या आरोपावरून ठाणे पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे, असे एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.
औरंगजेबाच्या कबरीजवळ उभा असलेला स्वतःचा फोटो पोस्ट
आरोपी ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातील समता नगरचा रहिवासी आहे. एका शिक्षकाने उल्हासनगर पोलिसांकडे तक्रार केली होती की, या व्यक्तीने त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर औरंगजेबाच्या कबरीजवळ उभे असलेला स्वतःचा फोटो पोस्ट केला आहे, असे हिल लाईन पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा - MPSC Result: बीडची ऋचा कुलकर्णी राज्यात प्रथम, MPSC ने जेएमएफसीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी केली जाहीर
गुन्हा दाखल
फोटोच्या खाली काही आक्षेपार्ह टिप्पण्या लिहिलेल्या होत्या, असे ते म्हणाले. त्यानंतर शिक्षकाने तक्रार दाखल केली, ज्याआधारे पोलिसांनी शनिवारी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 196(1) (धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादींच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि सौहार्द राखण्यास प्रतिकूल कृत्य करणे) आणि 299 (कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावनांना अपमानित करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून आणि दुर्भावनायुक्त कृत्य करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
प्रकरणाचा तपास सुरू
या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.