एजन्सी, मुंबई. Mumbai Civic Polls 2026: आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
शनिवारी पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले की, सत्ताधारी पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढवतील हे निश्चित आहे आणि बीएमसीमध्ये युती सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात. कोणाला किती जागा मिळतात यावर बोलण्याऐवजी, आम्ही महायुती म्हणून 227 जागा लढवत आहोत,” असे ते म्हणाले.
शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यावर टीका करताना सामंत म्हणाले की, काही पक्षांनी त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी युती केली आहे.
जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच होणार जाहीर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप युतीसाठी उत्सुक आहेत परंतु त्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला आणि त्यांच्या उमेदवारांची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. बीएमसीमध्ये 227 वॉर्ड आहेत.
दोन्ही पक्षांमध्ये जागांवरून गतिरोध कायम आहे आणि मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली येथील नागरी संस्थांसाठी अजूनही चर्चा सुरू आहे, असे शिवसेनेच्या एका नेत्याने यापूर्वी म्हटले होते.
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर आहे.
