जेएनएन, छत्रपती संभाजीनगर. Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्येही एका विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
कटरने केले 15 वार
एका 19 वर्षीय विकृत मानसिकतेच्या तरुणाने 36 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, यावेळी विवाहितेने आरडाओरड सुरू करत प्रतिकार केल्याने त्या विकृताने महिलेच्या शरीरावर धारदार कटरने जवळपास 15 वार करत तिला जखमी केले आहे. तसेच तिचा चेहराही विद्रूप करत हत्येचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी आरोपी अभिषेक तात्याराव नवपुते याला चिखलठाणा पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे, असे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधिक्षक विनय कुमार राठोड यांनी सांगितलं.
रुग्णालयात उपचार सुरू
या घटनेत आरोपीने पीडितेवर कटरने 15 हून अधिक वार करत तिचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर संभाजीनगर मधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं विनय कुमार राठोड यांनी सांगितलं.