नाशिक -Ashok Kharat Case: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मधील भोंदू बाबा अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत असून त्याच्या विरोधात तक्रारींचा ओघ सुरूच आहे. भविष्य सांगण्याच्या नावाखाली शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु असून त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात. याचदरम्यान आता अशोक खरातविरोधात 7 वा गुन्हा दाखल झाला आहे. शिर्डीत त्याच्याविरोधात एका पाडित तरुणीने एफआयआर दाखल केली आहे. कोणत्या शाखेला प्रवेश घेऊ, याबाबत सल्ला घेण्यालाठी गेलेल्या तरुणीला संमोहित (Hypnotism) करून तिच्यावर त्याच अवस्थेत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भोंदूचा तरुणीवर चार वेळी बलात्कार -
अशोक खरातनं पीडितेवर चार वेळा बलात्कार केल्याचा तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. मी महादेवाचा अवतार आहे, माझ्यात प्रचंड दैवी शक्ती आहे, असे सांगून पीडितेला आपल्या जाळ्यात ओढले. तुझे करिअर उज्ज्वल करून देतो, असे आमिष दाकत तिला एका तांब्याच्या ग्लासमधून पाणी प्यायला दिले. त्यानंतर संमोहन करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याची वाच्याता कोठे केल्यास दैवी शक्तीने आई-वडिलांना मारुन टाकीन अशी धमकीही भोंदू देत असते. जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान अशोक खरातने चार वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने दाखल केली आहे. या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलिसांनी खरातवर गुन्हा दाखल केला आहे.
नरबळीचाही संशय -
नाशिकमधील भोंदूगिरी आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने आता अत्यंत भयंकर वळण घेतलं आहे. अशोक खरात तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचं शोषण करत होता. त्याचबरोबर आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्याच्या घरातून तांब्या जप्त करण्यात आला असून त्यात पाच रिकामी काडतुसे मिळाली आहेत. याचा वापर त्याने कशासाठी केला याचा तपास केला जात आहे, त्याने 5 जणांचा नरबळी दिल्याचा खळबळजनक संशय व्यक्त केला जात आहे.
